गुरुवार, १८ मार्च, २०१०
सामनाही युनिकोडात
आता सामना हे वृत्तपत्रही युनिकोडात दिसू लागले आहे. लवकरच उरलेली वृत्तपत्रेही युनिकोडात यावीत. मराठी वृत्तपत्रांच्या प्रसाराला ही गोष्ट फारच उपकारक ठरणार आहे.
सोमवार, ८ मार्च, २०१०
नवी माहितीपुस्तिका
युनिकोडाच्या साहाय्याने संगणकावर मराठी कसे वापरावे? ह्या पुस्तिकेसाठीचा दुवा उजवीकडच्या चौकटीत दिला आहे।
http://sites.google.com/site/yunikodatunmarathi/dharika ह्या संकेतस्थळावरूनही ही पुस्तिका उतरवून घेता येईल.
http://sites.google.com/site/yunikodatunmarathi/dharika ह्या संकेतस्थळावरूनही ही पुस्तिका उतरवून घेता येईल.
मंगळवार, २० जानेवारी, २००९
संगणकावर युनिकोड आहे की नाही हे कसं ओळखावं?
संगणकावर युनिकोड आहे की नाही हे कसं ओळखावं?
१. पुढील खुणांवर क्रमाने टिकटिकवा. Start > Control panel > Regional and Language options
२. ह्या ठिकाणी गेल्यावर एक चौकट उघडेल. त्यातील वरच्या बाजूला असलेल्या Languages ह्या खुणेवर बाण नेऊन टिकटिकवा. पुढील आकृतीत दाखवल्याप्रमाणे दृश्य दिसेल.
३. चौकटीच्या ह्या भागात खाली Supplemental language support ह्या भागातील दोन पर्यायांपैकी Install fiels in complex and right-to-left languages (including Thai) हा पहिला पर्याय निवडला आहे का हे पाहा जर तो निवडलेला असेल तर तुमच्या संगणकावर युनिकोड आहे. जर निवडलेला नसेल तर तुमच्या संगणकावर मराठीसाठी युनिकोड कार्यरत केलेलं नाही.
बुधवार, ७ जानेवारी, २००९
लोकसत्ता युनिकोडात !
सकाळीच सुशांत म्हणाला की लोकसत्ताने युनिकोड वापरायला सुरूवात केली आहे. http://www.loksatta.com पाहा.
आता मराठीमधील ३ चांगली वृत्तपत्रे महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, सकाळ ही युनिकोडात आहेत. मराठीचा वापर वाढण्याच्या दृष्टीने हा बदल चांगला आहे.
आता मराठीमधील ३ चांगली वृत्तपत्रे महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, सकाळ ही युनिकोडात आहेत. मराठीचा वापर वाढण्याच्या दृष्टीने हा बदल चांगला आहे.
शनिवार, १५ नोव्हेंबर, २००८
इनस्क्रिप्टचा कळपाटाचा आराखडा वापरून मराठी लिहिताना '?, !' इ. चिन्हं लिहिता येत नाहीत, ती लिहिता येण्यासाठी काय करावं?
इनस्क्रिप्टचा कळपाटाचा आराखडा वापरून मराठी लिहिताना '?, !' इ. चिन्हं लिहिता येत नाहीत, ती लिहिता येण्यासाठी काय करावं?
मराठी लिहिण्यासाठी आपण जर इनस्क्रिप्टचा कळपाटाचा आराखडा वापरत असाल तर; आधुनिक मराठी लेखनात आपण नेहमी वापरतो त्या त्या चिन्हांकरता किंवा काही गणिती चिन्हांकरता कळा नेमलेल्या नाहीत. उदा.
आधुनिक मराठी लेखनात आपण नेहमी वापरतो ती विरामचिन्हं
किंवा पुढील गणिती चिन्हं
लक्षात घ्या की युनिकोडात त्यासाठी स्वतंत्र क्रमांक दिलेले आहेत. पण इन्स्क्रिप्टच्या कळपाटात ते क्रमांक नि कळा ह्यांची जुळणी नसल्याने इन्स्क्रिप्टच्या कळपाटातून ही चिन्ह लिहिता येत नाहीत. त्यासाठी आपल्याला इंग्रजीचा कळपाट तात्पुरता वापरावा लागेल. Alt आणि Shift ह्या कळा एकदम दाबून आपण मराठी लिहिताना तात्पुरता इंग्रजीचा कळपाट वापरू शकाल.

प्रश्नचिन्ह ?
उद्गारचिन्ह !
अर्धविराम ;
द्विबिंदू :
एकेरी अवतरणचिन्ह ''
दुहेरी अवतरणचिन्ह ""
पर्यायक /
किंवा पुढील गणिती चिन्हं
अधिक +
न्यूनतर <
अधिकतर >
टक्के %
लक्षात घ्या की युनिकोडात त्यासाठी स्वतंत्र क्रमांक दिलेले आहेत. पण इन्स्क्रिप्टच्या कळपाटात ते क्रमांक नि कळा ह्यांची जुळणी नसल्याने इन्स्क्रिप्टच्या कळपाटातून ही चिन्ह लिहिता येत नाहीत. त्यासाठी आपल्याला इंग्रजीचा कळपाट तात्पुरता वापरावा लागेल. Alt आणि Shift ह्या कळा एकदम दाबून आपण मराठी लिहिताना तात्पुरता इंग्रजीचा कळपाट वापरू शकाल.
मंगळवार, २८ ऑक्टोबर, २००८
संगणकातील कार्यकारी प्रणालीसोबत मिळालेल्या युनिकोडाचा वापर कसा करायचा?
संगणकातील कार्यकारी प्रणालीसोबत मिळालेल्या युनिकोडाचा वापर कसा करायचा?
आपल्या संगणकावरील कार्यकारी प्रणालीत युनिकोड असलं तरी अनेकदा ते कार्यरत केलेलं नसतं. विशेषतः आपण एखाद्या कंपनीचा आयता संगणक न घेता विविध भाग जुळवून तयार केलेला सांधीव संगणक घेतो तेव्हा. ते कार्यरत केलेलं नसेल अशा वेळी त्या कार्यकारी प्रणालीची चकती (सीडी) वापरून ते कार्यरत करून घ्यावं लागतं. ही प्रक्रिया एकदाच करावी लागते. पुन्हा पुन्हा चकती वापरावी लागत नाही. तेव्हा आपल्या संगणकावर युनिकोड बसवलेलं आहे की नाही हे एकदा तपासून घ्या.
युनिकोड म्हणजे काय?
युनिकोड म्हणजे काय?
युनिकोड ही लिपिचिन्हांची एक प्रमाणित संकेतप्रणाली आहे (पाहा : http://unicode.org).
- ती वापरून आपण संगणकावर मराठीच्या देवनागरी लिपीत सहज लिहू शकतो. तो मजकूर इतरांना सहज वाचता येऊ शकतो.
- ही प्रणाली आपल्या संगणकावरच्या कार्यकारी प्रणालीसोबतच (ऑपरेटिंग सिस्टिम).
- ही प्रणाली आपल्याला विनामूल्य मिळते. त्यासाठी वेगळे पैसे खर्च करण्याची आवश्यकता नसते.
- ही संकेतप्रणाली प्रमाणित आहे. त्यामुळे गोंधळ होणं टळतं.
- तिची व्याप्ती विशिष्ट भाषेपुरती नाही. जगातील बहुतेक प्रमुख भाषांच्या लिप्यांना ही प्रणाली सामावून घेते.
लेबल:
युनिकोड,
संकेतप्रणाली,
Unicode
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)