मराठी लिहिण्यासाठी आपण जर इनस्क्रिप्टचा कळपाटाचा आराखडा वापरत असाल तर; आधुनिक मराठी लेखनात आपण नेहमी वापरतो त्या त्या चिन्हांकरता किंवा काही गणिती चिन्हांकरता कळा नेमलेल्या नाहीत. उदा.
आधुनिक मराठी लेखनात आपण नेहमी वापरतो ती विरामचिन्हं
प्रश्नचिन्ह ?
उद्गारचिन्ह !
अर्धविराम ;
द्विबिंदू :
एकेरी अवतरणचिन्ह ''
दुहेरी अवतरणचिन्ह ""
पर्यायक /
किंवा पुढील गणिती चिन्हं
अधिक +
न्यूनतर <
अधिकतर >
टक्के %
लक्षात घ्या की युनिकोडात त्यासाठी स्वतंत्र क्रमांक दिलेले आहेत. पण इन्स्क्रिप्टच्या कळपाटात ते क्रमांक नि कळा ह्यांची जुळणी नसल्याने इन्स्क्रिप्टच्या कळपाटातून ही चिन्ह लिहिता येत नाहीत. त्यासाठी आपल्याला इंग्रजीचा कळपाट तात्पुरता वापरावा लागेल. Alt आणि Shift ह्या कळा एकदम दाबून आपण मराठी लिहिताना तात्पुरता इंग्रजीचा कळपाट वापरू शकाल.
३ टिप्पण्या:
ह्याठिकाणी इनस्क्रिप्ट म्हणजे नक्की काय आणि स्वरानुसारी किंवा उच्चारानुसारी (phonetic) म्हणजे नक्की काय व त्यातील फरक काय हे सांगितले तर उपयोग होईल. तसेच, स्वरानुसारी किंवा उच्चारानुसारी कळपाट हवा असेल, तर भाषाइण्डियाच्या संकातस्थळावर जाऊन अमुक अमुक ठिकाणाहून ते वापरावे अशी माहिती उपयोगी ठरेल.
सूचना अगदी योग्य आहे. लवकरच ही माहिती उपलब्ध करून देऊ.
युनिकोडमध्ये अॅ कसा लिहायचा ते समजत नाही. इथे लिहिता येतो, पण वर्डमध्ये येत नाही. मार्गदर्शन मिळाल्यास आभारी होईन.
नंदिनी आत्मसिद्ध
टिप्पणी पोस्ट करा