गुरुवार, २२ एप्रिल, २०१०

विंडोज एक्स्पीत युनिकोड कार्यरत करून मराठी कसे लि्हावे ह्याची दृक्श्राव्य शिकवणी

आपल्या संगणकावर विंडोज एक्स्पी ही कार्यकारी प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टिम) असेल तर त्यातील सोय वापरून युनिकोडाच्या साहाय्याने मराठीत कसं लिहिता येईल ह्याविषयीची मराठी निवेदन असलेली दृक्श्राव्य शिकवणी पाहा.


३ टिप्पण्या:

mannab म्हणाले...

सप्रेम नमस्कार.
मी आपला हा युनिकोडवरचा पोस्ट वाचला आणि ऐकला. अत्यंत आभारी आहे. मी पूर्वी लोकसत्ता Font freedom हे software वापरत होतो. आता जी मेलने दिलेली सुविधा वापरून मराठीतून इ-मेल पाठवतो. पण पुढील इंग्रजी व काही मराठी शब्दांच्या बाबतीत अडचणी येतात. ते शब्द कसे टाईप करावे हे कृपया मार्गदर्शन करावे.
ते शब्द असे :- ash, bakelite, font, Franklin, fax हे इंग्रजी उच्चाराचे शब्द नीट लिहिता येत नाहीत.
तसेच मराठीतून लिहिताना "करणा-या: हा शब्द टाईप करताना शेवटचे अक्षर -yaa असे टाईप करावे लागते.
यावर उपाय सुचवावा. आपला इमेल आय.डी. कळवल्यास प्रत्यक्ष संपर्क करणे सोयीचे व्हावे. धन्यवाद.
आपला,
मंगेश नाबर

maumad म्हणाले...

@mannab: aa ऐवजी तुम्ही A लिहू शकता.

मलापण font, frank fax ह्या शब्दांवरील चंद्र काढता येत नाही.

UPADHYE GURUJI म्हणाले...

धन्यवाद !!!!
आपल्या या शिकवणीने माझ्यासारख्या कॉम्प्युटर शिक्षण न घेतलेल्या व्यक्तीला सुद्धा सहज आपला पीसी युनिकोड करता आला.
आभारी आहे.
--
उपाध्ये गुरूजी, जेजुरी.