रविवार, १८ सप्टेंबर, २०११

विंडोज-७-मध्ये मराठी वापरा

२ टिप्पण्या:

Ranjan म्हणाले...

मी काही वर्षांपूर्वी एक ४०० पानांचे पुस्तक मराठीत टाइप केले होते. ते इन्सक्रिप्ट वापरून सुबक फॉन्टमध्ये डॉक फाइलच्या रूपात आहे. त्यात एरियलमधले प्रश्नचिन्ह, कोलन, तसेच सुपरस्क्रिप्ट, फुटनोट, वगैरेंचा वापर केलेला आहे. मला सुबक फॉन्टचे मंगल युनिकोडमध्ये रूपांतर करायचे आहे, तेही बाकीचे फॉन्ट व फॉरमॅटिंग न बदलता. हेतू हा की, माझे पुस्तक इंटरनेटवर घालता यावे. ह्यावर आपले मार्गदर्शन मिळेल काय.

रंजन केळकर
पुणे

सुशान्त म्हणाले...

युनिकोडव्यतिरिक्तच्या इतर संकेतप्रणाल्यांत असलेल्या सामग्रीचं रूपान्तर करून देणारी एक संगणकप्रणाली http://ildc.in/Marathi/tools/5.htm ह्या दुव्यावर उपलब्ध आहे (इथे दिलेला दुवा विंडोज २००० आणि त्यापुढील कार्यकारी प्रणाल्यांसांठीचा आहे. इतर कार्यकारी प्रणाल्यांसाठी http://ildc.in/Marathi/mdownload.html हे पान पाहा.)
पण ह्यात सुबकमधून युनिकोडात रूपान्तर करता येईल का ते माहीत नाही. कारण सुबक ह्या टंकासाठी नेमकी कोणती संकेतप्रणाली वापरलेली आहे ते पाहावं लागेल. तरी प्रयत्न करून पाहा.
अन्य कुणी सुबकवरून युनिकोडात रूपान्तर करण्याची काही सोय केली आहे का ह्याचा शोध घ्यावा लागेल.